न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- दोन वर्षाकरीता तडीपार केलेल्या तरुणाने बेकायदेशीरपणे शहरात प्रवेश केला. हातात धारदार लोखंडी कोयता घेवून मोहननगर भागात फिरुन रस्त्याने येणा-या जाणा-या नागरिकांना कोयता दाखवत “मी इथला भाई आहे, कोणाला सोडणार नाही” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
त्याला भिऊन दुकानदारांनी दुकानाचे शटर ओढून दुकाने बंद केले तर, नागरिकांनी घाबरून दार-खिडक्या बंद केल्या. ही घटना (दि. २४) रोजी सायंकाळी ५.४० च्या सुमारास शंकरनगर कमानीजवळ, मोहननगर, चिंचवड येथे उघडकीस आली.
निहाल महमद शेख (वय २५ वर्षे रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर ५८/२०२४भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५, १४२, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक गावीत पुढील तपास करीत आहेत.













