न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ ऑगस्ट २०२६) :- पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवारी (दि. १५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता, मुख्य बस स्टॉप, महापालिका शाळेसमोर, पिंपळे निलख येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.
यावेळी आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे, पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रा.नितीन बानुगडे यांचे व्याख्यान होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप स्मृती पुरस्कार आणि स्व. सुरज काळुराम नांदगुडे स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दिनकर सिताराम सावंत, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील शरद विनायक वाघ, यशस्वी उद्योजक गणेश बाळासाहेब देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य सहाय्यक सिकंदर तामचेकर, कुस्तीपटू विश्वजित कोंढे, अध्यात्मिक क्षेत्र क्षितिज साठे, जागतिक स्केटिंग विक्रमवीर सर्वज्ञ जगताप यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संपर्क करावा : 7798511742


















