न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
वसंत बाबर हे पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील म्हाळुंगे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. २८ वर्षांच्या पोलीस सेवेत बाबर यांना ३५१ बक्षीस तर २३ प्रशस्तीपत्र मिळाली आहेत.















