न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना बुधवारपासून म्हणजेच ३१ जानेवारीपासून माध्यमिक शाळांमध्ये मिळणार आहेत. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमार्फत ही प्रवेशपत्र मिळणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
राज्य मंडळाकडून दहावीची बोर्डाची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४च्या परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर बुधवारपासून ‘स्कूल लॉगिन’मध्ये डाऊनलोड करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. सर्व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून द्यायची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये. संबंधित प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
तसेच विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांस माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावा, अशा सूचना ओक यांनी प्रकटनाद्वारे