न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात तब्बल १० वर्षापासून फरारी असणाऱ्या दोन सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
१) विकी सुरेंद्र सहाणी उर्फ निशाद (वय- २९ वर्षे रा. पिंपळे सौदागर, २) राजन सुरेंद्र सहाणी उर्फ निशाद (वय-४० वर्षे, रा. औंधगाव) असे बेड्या ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. ६४/२०१४ भादवि कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९ या गुन्हयात दोघेही पाहीजे आरोपी होते.
पेटींगचे काम करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांनी गुन्हा केल्याची तोंडी कबुली दिल्याने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी वाकड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डोईफोडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, सतिश माने सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहा. पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उप-निरीक्षक अशोक जगताप, तसेच पोलीस अंमलदार विजय नलगे, शैलेश मगर, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.