न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०१९) :- देशाचे पंतप्रधान विकासाच्या मुद्यावरती बोलतचं नाहीत. त्यांच्या भाषणात केवळ पक्षनेते शरद पवार यांच्यावरती टीकाच असते. विकासाभिमुख मुद्द्यांना बगल देत ते केवळ जनतेचा भ्रमनिरास करीत आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ काळेवाडीतील बालाजी लॉंन्स येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बोलत होते.
धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, ”मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल बोलावं. नोटाबंदी, जीएसटी लागू करून, किती गोर-गरीबांचा फायदा झाला. त्याची आकडेवारी जाहीर करावी. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी व आदी ठिकाणच्या जागांवर केवळ राष्ट्रवादीचेच उमेदवार जिंकणार आहेत. तुमचं एक मतदान लोकशाही वाचवणारे आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी यावेळी केले.
जयंत पाटील म्हणाले की, ” पाकिस्तानला धडा शिकविण्याची ताकद केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीमध्येच आहे. भाजप व मित्रपक्ष पुलवामा घटनेचा राजकीय फायद घेत आहेत. भावनिक मुद्यांचे राजकारण केले जात आहे. पाकिस्तानची भीती दाखवून मते मागण्याचे षड्यंत्र मोदींकडून केले जात आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप सोपल, प्रकाश गजभिये, नदीम जावेद, काँग्रेसचे सचिन साठे, सुलक्षणा सलगर, सुषमा अंधारे, नगरसेवक नाना काटे, विनोद नढे, संतोष कोकणे, उषा काळे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर व आदी उपस्थित होते.











