न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून आज पिंपरी चिंचवडचे नंदनवन झाले आहे. त्यांच्यामुळेच शहराचे नाव जगभरात पोहचले आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकना-या पवार घराण्याविषयी तोंडसुख घ्यायचे बंद करा. यापुढे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पवारांवर केलेली टीका कदापि सहन करणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी पालकमंत्री गिरीश बापटांच्या त्या वक्तव्यावर दिली असून, त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना कलाटे म्हणाले की, ” पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकास हा भाजप शिवसेनेने केला असल्याचे सांगत, पालकमंत्री गिरीश बापट यांनी पवार यांच्यावर शुक्रवारी पत्रकार परिषदेत टीका केली होती. यावर बापट साहेब हे ‘वागण बर नव्हं’, असे सांगत, पवार घराण्यावर तोंडसुख घेणे बंद करा. शरद पवार यांनी आपले उभे आयुष्य समाजसेवेत घालवले. त्यांनी केंद्रात सक्षमपणे नेतृत्व केले. अजितदादांनी उत्तमरीत्या राज्याचे नेतृत्व केले आणि पिंपरी चिंचवड शहराचा झालेला विकास कोणी केला, हे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना चांगलेच माहित आहे.
तुमच्या हातात सत्ता देवून देखील आपण शहरातला एक ही प्रश्न सोडवला नाही. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याची जाणीव नागरिकांना आता झालेली आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन अटळ आहे. लोकशाहीनुसार प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु, शिवसेना भाजपकडून गेल्या काही दिवसापासून अतिशय खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका केली जाता आहे. आता यापुढे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता साहेबांवरील टीका कदापि सहन करणार नाही”.











