न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- भाजप, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खा. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ निगडी-प्राधिकरणातील अप्पूघर, दुर्गा टेकडी परिसरात नागरिकांशी संवाद साधण्यात आला व प्रचारपत्रकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी राज्यमंत्री सचिन पटवर्धन, अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेविका शर्मिलाताई बाबर, मा. उपमहापौर शैलजा ताई मोरे, राजेंद्र बाबर, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष कैलास कुटे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष रामभाऊ पांढरकर, प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडल अध्यक्ष सचिन पांढरकर, मा. नगरसेविका वृषाली ताई मोरे, नरेंद्र येलकर, कोमल ताई काळभोर, मा. महापौर आर एस कुमार, अमोल निकम, बाप्पू सिनकर, बोरलीकर मॅडम, राजेश फलके, खंडू शेठ, अमोल निकम व सर्व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.











