न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २ मे २०१९) :- सातारा रस्त्यावरील नारायणपूर येथे भर रस्त्यात पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. हसन शेख असे खून करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून, त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर गाेळीबार करण्यात आला.
हसन शेख हा सिंहगड राेड पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. आज सकाळी शेख हा नारायणपूर येथून त्याच्या कारने जात असताना अज्ञात हल्लेखाेरांनी बाेलेराेने त्याच्या कारला धडक दिली. त्यांनतर त्याच्यावर गाेळीबार केला.
तसेच त्याला कारच्या बाहेर काढत त्याच्यावर काेयत्याने वार करण्यात आले. भररस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला करुन हल्लेखाेर पसार झाले. हडपसर पाेलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करत आहेत.











