- निशा यादव यांची समिती सदस्यपदी नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- कुदळवाडीतील ‘पीसीएमसी’ शाळेमध्ये बुधवारी (दि. २१) रोजी ‘सखी सावित्री’ समितीची स्थापना करण्यात आली आहे. निशा यादव यांची समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शाळेमध्ये अनुचित प्रकार घडु नये म्हणून समितीची स्थापना करण्यात आली आहे. शालेय मुलांची सुरक्षा, त्यांना कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू नये हा समिती स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. समितीची दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बैठक घेण्यात येणार आहे. या समितीमध्ये महिला शिक्षक, महिला पालक, विद्यार्थिनी, महिला डॉक्टर व स्थानिक महिला व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांचा समावेश करण्यात आला आहे.
बैठकीत शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन, नवनिर्वाचित समिती सदस्या निशा यादव, डॉ. सुजाता यादव, गायकर, चौधरी, महिला पालक आश्विनी कांबळे व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.