- पालिका आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत ‘संवाद सोसायटीधारकांचा’ उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- भोसरी विधानसभा मतदार संघातील तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, भोसरी येथील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याकरिता, विकासासाठी सूचना व संकल्पना मांडण्यासाठी ‘संवाद सोसायटीधारकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखली, मोशी, चऱ्होली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने रविवारी लक्ष्मी चौक, चिखली येथील सिझन बॅन्क्वेट हॉल येथे सकाळी १० वाजता ‘संवाद सोसायटीधारकांचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सोसायटीधारकांशी विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत अशी माहिती फेडरेशनच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सभासद आणि प्रतिनिधींनी आपल्या तक्रारी, सूचना सोसायटीच्या अधिकृत लेटरहेडवर दि. २० ऑगस्टपर्यंत [email protected] या ई-मेलवर आणि ८९५६२१६३९० या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन सोसायटी फेडरेशनकडून करण्यात आले आहे.


















