न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- मागील काही वर्षापासुन १९ वर्षीय मुलीचे २५ वर्षीय तरुणाशी प्रेमसंबध होते. मुलीने लग्न कर असा तगादा लावला असता तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी काहीही झाले तरी लग्न लावुन देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे डिप्रेशनखाली येवुन मुलीने राहत्या घरी ओढणीच्या साहयाने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.
ही घटना (दि.३१.०८.२०२४) रोजी दुपारी ४.०० वा सुमारास हिंजवडी येथे घडली. कैलास मुरलीधर गायकवाड यांनी आरोपी १) सुबोध सुधिर साखरे (वय २५ वर्ष, रा.साखरे वस्ती हिंजवडी), २) रोहन सुदाम पारखी (वय ३० वर्ष, रा. मुलानी वस्ती मान ता. मुळशी जि.पुणे), ३) सुधिर साखरे (रा. साखरे वस्ती हिंजवडी), ४) सुबोध साखरे यांची आई, ५) महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ९९४/२०२४ भा.न्या.संहीता कलम १०८, ३(५) नुसार गुन्हा दाखल करीत आरोपी नं. १ व २ यांना अटक केली आहे. पोउपनि झोल पुढील तपास करीत आहेत.