न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू हे एका खासगी कार्यक्रमासाठी मंगळवारी (दि. ३) रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुण्यातील नांदेगांव- सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे या मार्गावरील हलकी, जड, अवजड वाहतुक पहाटे एक ते दुपारी चार वाजेपर्यंत इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.
या मार्गावरील वाहतूक नांदेगाव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे अशी वळविण्यात आलेली आहे.
वाहन चालकांनी नांदेगाव – सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे बाजुकडे न जाता त्यांनी नांदेगाव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे