न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ३१ मे २०२५) :- काही महिन्यांपुर्वी झालेल्या भांडणात आरोपीला ‘लंगड्या’ असा शब्द वापरल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमताने महिलेच्या घरात प्रवेश केला. शिवीगाळी देवुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी क्र २ याने त्याचे हातामधील कोयता फिर्यादी यांचा मुलगा बिभीषण याच्या डोक्यामध्ये मारुन गंभीर स्वरुपाची दुखापत केली. आरोपी क्र ३ याने हाताबुक्याने मारहाण करुन शिवीगाळी देवुन दमदाटी केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
भिमशक्तीनगर मोरेवस्ती, चिखली येथे ही घटना घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) सुदाम गजानन राऊत वय-४५ वर्षे २) शुभम सुदाम राऊत वय-२२ वर्षे रा. मोरेवस्ती, चिखली, ३) सौरव मस्के पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.