न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२५) :- पिंपळे निलख, विशालनगरमधील कचरा उचलणाऱ्या गाड्यांची दयनिय अवस्था झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत AG Enviro या खाजगी ठेकेदाराकडून कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. परंतु AG Enviro या ठेकेदारांकडून नागरिक आणि गाडीचालक यांच्या जिवाशी खेळण्याचे काम चालू आहे.
वाहनात चालकाच्या पायाखाली मोठे भगदाड पडले आहे. वाहनचालकाचा पाय चुकून त्या खड्यात गेल्यावर नक्कीच मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये कचरा गोळा करताना त्यांनी वेगवेगळा कचरा घ्यायला हवा.
तो एकत्रच घेतला जात होता. या ठेकेदाराची रोज एक गाडी खराब होते. त्यामुळे पिंपळे निलख विशाल नगर मधील कचरा रोजच्या रोज उचलला जात नाही. तो नियमितपणे उचलला जावा, अशी मागणी आपचे रविराज काळे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.