- दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२५) :- पन्नास हजार रूपये किंमतीचे दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे व एक जिवंत काडतुस विना परवाना जवळ असणाऱ्या तरूणाला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. प्रिन्सकुमार मुन्ना सिंह (वय-२२ वर्ष, रा. बिबेवाडी पुणे, मुळगांव-बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पिंपरी पोलिसांनी चिंचवड येथील रामनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. रोहीत रघुनाथ वाघमारे, पोलीस शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.














