न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२४) :- मोबाईलवर संपर्क साधून ‘एमएनजीएल गॅस कनेक्शनचे मागील महिन्याचे बिल पेडींग आहे’ असं म्हणत ऑनलाईन लिंक पाठवली. ऑनलाईन बँकिंगव्दारे ७ रुपये पाठविण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या पतीचा मोबाईल व बँक खाते हॅक करुन बँकेचे क्रेडीट कार्ड व बँकेच्या खात्यामधुन एकुण २,४३,४२८.४० रुपये एवढी रक्कम काढुन घेवुन फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. ११/०७/२०२४) रोजी सायंकाळी ०४/०० ते ०४/३५ वा. चे दरम्यान, बो-हाडेवाडी, मोशी येथे घडला. ४१ वर्षीय महीला फिर्यादीने मो.नं. वरील अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ४३२/२०२४बी.एन.एस. कलम ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चेकलम ६६ डी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गणेश जामदार तपास करीत आहेत.