न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ३१ मे २०२५) :- चाकण येथील बिरदवडी गावातील आंबेठाण ते चाकण रस्त्यालगत भरधाव आलेल्या ट्रकने पाठीमागुन दोघांना धडक दिली. अपघातात त्यांच्या दोन्ही हाताला व डोक्यास मार लागुन गंभीर दुखापत होवुन ते मयत झाले. आरोपी ट्रकचालक त्यास कारणीभुत झाला आहे.
फिर्यादी यांच्या साडुचा मुलगा सुजय कडुसकर व त्यांचा भाऊ उल्हास यांचा मुलगा सोहम कडूसकर यांचा मृतात समावेश आहे. याप्रकरणी योगेश विष्णू कड यांनी आरोपी गणेश वसुदेव मायकर (वय ३० वर्षे धंदा ड्रायव्हर राहणार मु साळींबा ता. वडवणी, बीड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.











