अपघातात चौघेजण गंभीर जखमी..
महिलेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ डिसेंबर २०२४) :- मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड स्टेशनच्या महावीर चौकात महिला वाहन चालकाने सिग्नलला थांबलेल्या टाटा नेक्सन कारला पाठीमागून धडक दिली. सोबतच आणखी एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे त्या वाहनांच्या पुढे असणाऱ्या दुचाकीला फिर्यादीच्या कारची धडक बसली. अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आरोपी महिला वाहन चालकाच्या कारचेही नुकसान झाले आहे.
हा प्रकार (दि.०१) रोजी दुपारी पावणेचारच्या दरम्यान पुणे- मुंबई हायवे वरील आंनद नगर झोपडपट्टी येथील स्टार बेस्ट बेकरी समोर महाविर चौक, चिंचवड येथे घडला आहे.
याप्रकरणी बिधान सुधीरकुमार साहु यांनी आरोपी टोयोटो अरबन क्रझर हायरायडर (गाडी नंबर एमएच. १४ एलआर २०१६) वरील चालक महिला (वय- २५ वर्षे, रा. निगडी) हीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीसांनी १०७६/२०२४ भा.न्या.सं. कलम २८१,१२५ (ए), १२५ (बी), ३२४ (४) (५) सह मोवाका कलम- १८४, ११९/१७७ प्रमाणे महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
सपोफौ जगताप पुढील तपास करीत आहेत.












