- प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणीमध्ये अनिताताई काटे यांच्या प्रचाराला वेग..
- मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. 02 जानेवारी 2025:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांच्या प्रचाराला वेग आला आहे.
प्रचाराची धुरा स्वतः काटे कुटुंबीयांनी खांद्यावर घेतली असून, पती संदीपशेठ काटे, दीर निलेश काटे तसेच पुतण्या धीरज काटे यांनी घराघरात जाऊन जनसंपर्काचा धडाका लावला आहे. गुरुवारी (दि. 02) रोजी पिंपळे सौदागर परिसरातील शिवार गार्डन, कुणाल आयकॉन, विश्वशांती कॉलनी या भागांत नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधण्यात आला.
या भेटीदरम्यान प्रभागातील प्रलंबित प्रश्न, नागरी सोयीसुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता आदी मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मते मांडली. त्यावर काटे कुटुंबीयांनी योग्य तो आढावा घेऊन समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
‘आपलं मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना-म्हणजेच विकासाला’ या संकल्पनेला मतदार साद घालताना दिसत आहेत. भाजपाची विकासाभिमुख ध्येयधोरणे, केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या विविध योजना यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
निवडणूक जवळ येत असल्याने प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांमध्ये भाजप नेतृत्वाच्या उपस्थितीत विविध बैठका, जनसंपर्क सभा आणि मोहिमा राबवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
“प्रचारादरम्यान मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यक्त झालेला विश्वास हा आगामी निवडणुकीतील विजयाचा पाया ठरेल, असा विश्वास अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केला. महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि तरुणांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प अनिताताई संदीप काटे यांनी व्यक्त केला.”











