- जळगावमधील पाचोरा स्टेशनजवळील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२५) :- जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये ११ प्रवाशांची मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदतकार्यक केले जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत. तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत. तसेच चार लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ७ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.
मध्य रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील निला यांनी अपघाताबद्दल माहिती देताना सांगितले की, “जळगावमध्ये लखनऊहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पाचोरा स्टेशनजवळ, अलार्म चेन पुलिंगची घटना घडली. या घटनेनंतर काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने जात असलेली कर्नाटक एक्सप्रेस गाडी तेथून जात होती जिचा काही प्रवाशांना ट्रेनची धडक दिल्याची माहिती आम्हाला मिळाली”.
ते पुढे बोलताना म्हणाले की, “प्राथमिक माहितीनुसार, ७ ते ८ प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचारासाठी आम्ही जवळच्या रुग्णालयांची मदत घेतली आहे. कर्नाटक एक्स्प्रेसने आपला पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे आणि जखमी प्रवाशांना मदत मिळाल्यानंतर लगेच पुष्पक एक्स्प्रेस देखील आपला प्रवास पुन्हा सुरू करेल”.











