न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 29 जानेवारी 2025) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट चिखली येथे 26 जानेवारी प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
चिखली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय देवकुळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मधुकर थोरात, प्रभागातील माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच आयआयबीएम ग्रुपचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, यश वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, विभागप्रमुख अनिकेत वंजारी, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ तसेच आयआयबीएम कॉलेजचे प्राध्यापक, व्यवस्थापकीय कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक आदींच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले.
मधुकर थोरात यांनी विद्यार्थ्यांना देशाविषयीची आत्मीयता, प्रेम व देशासाठी काहीतरी केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कायद्याबाबत आणि वाहतूक नियमांबाबत सतर्क राहण्याच्या सुचना केल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड अंतर्गत तळवडे वाहतूक विभागामध्ये मतदान केंद्रावर पोलीस मित्र म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या वाहतूक नियमन केले. तसेच शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करीत असतानाही पोलीस दलास शिक्षकांनी केलेल्या सहकार्याच्या भुमिकेसाठी तळवडे वाहतूक विभागाअंतर्गत आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, चिखली पुणे या संस्थेस उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव सन्मानचिन्ह तळवडे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर थोरात यांच्या हस्ते देण्यात येऊन संस्थेचे कौतुक करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामध्ये, देश भक्तीपर गीत, गायन, विद्यार्थ्याची भाषणे तसेच प्रथम वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मुलींबाबत घडत असलेले अॅसिड हल्ले याबाबत प्रत्याक्षिक दाखवून जनजागृती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद तायडे आणि उत्कर्ष जगताप तर नियोजन सौ. एकता सिंग यांनी केले. सर्व विद्यार्थी, पालक, उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप जाधव यांनी केले.
















