न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरात काही भागात जीबीएस (गिलीयन-बॅरी-सिंड्रोम) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे व त्या रोगाचे रूग्ण आढळून येत आहेत.
या पार्श्वभूमीवर सर्व गृहनिर्माण संस्थानी आपल्या सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या नियमीतपणे (वर्षातून दोनदा) स्वच्छ कराव्यात. बोअरवेल व विहिरीचे पाण्याचे नमुणे तपासणी करून मगच ते पाणी वापरावे. टॅंकर पुरवठा धारकाकडून टॅंकर भरण्याचे ठिकाणाबाबत सोसायटीला माहिती असणे आवश्यक आहे व तेथील पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. तदनंतर पाण्याचा वापर करावा.
पाण्याच्या टाकीत पिण्याचे पाणी व टॅंकरचे पाणी एकत्रित करू नये. २० लिटर जार मधील पाण्याची गुणवत्तेची खात्री करूनच वापर करावा सद्यस्थितीत पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
















