सुरज करांडे (क्राईम) प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित ऑनलाइन जुगार प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास मारुंजी परिसरात करण्यात आली.
याप्रकरणी गुन्हे शाखा, युनिट २ येथील पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये प्रणय मनोहर जांभुळे (वय २६), दुर्गेश गणेशराम छेदया (वय २०), सुनिलकुमार शैलेशभाई चौधरी (वय २८), सारंग बालाजी डफ (वय २५) व मुकेश कुमार कुसेराम (वय २७) यांचा समावेश आहे.
आरोपींनी ‘विन अड्डा’ या विनापरवाना ऑनलाइन बेटिंग पोर्टलद्वारे जुगार खेळवून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईत ३ लाख १ हजार रुपयांचे ऑनलाइन जुगार साहित्य जप्त करण्यात आले. बनावट बँक खाती, सिमकार्ड व कागदपत्रांच्या आधारे सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुढील तपास पोउपनि कांदे करीत आहेत.














