- सुरज करांडे, (क्राईम) प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फेसबुकवर ओळख करून प्रेमाचा बहाणा करत तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेनु संजय कुशवाह (वय २५, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड, रा. आंबेठाण, मूळ उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी बबलु रविंद्र कुशवाह (रा. उत्तर प्रदेश) याने फेसबुकवर मैत्री करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बहिणीच्या लग्नासाठी मदतीचे कारण सांगून फिर्यादीकडून रोख रक्कम, दागिने व मोबाईल असा एकूण ९२ हजार रुपयांचा ऐवज घेतला. मात्र, ही रक्कम व वस्तू परत न करता आरोपीने परस्पर अपहार करत विश्वासघात केला.
हा प्रकार १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला असून २२ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोउपनिरी खरात करीत आहेत.















