- अॅड. बी. के. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड अॅड असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीने नुकताच आपला पदभार स्वीकारला. पिंपरी न्यायालय येथील वकील बार रूममध्ये हा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. बी. के. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी वकिलांच्या हितासाठी संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमाची अध्यक्षता माजी अध्यक्षा अॅड. प्रमिला गाडे यांनी केली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ उपस्थित होते. मावळते अध्यक्ष अॅड. पांडुरंग शिनगारे व माजी अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निवडणूक अधिकारी अॅड. श्रीराम गालफाडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
अध्यक्षीय भाषणात अॅड. बी. के. कांबळे म्हणाले की, वकिलांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. बार व बेंच यांचे हितसंबंध सन्मानपूर्वक जपले जातील. मोरवाडी येथे होणाऱ्या नवीन सेशन कोर्टाच्या उद्घाटनानंतर तेथेही वकिलांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अॅड. वर्षा मधुकर कांबळे / तिडके, सचिवपदी अॅड. नारायण रामभाऊ थोरात, महिला सचिवपदी अॅड. श्वेता यशवंत भोसले, सहसचिवपदी अॅड. प्रिया नंदकुमार धावडे, हिशोब तपासणीस अॅड. सिंधु विजय भोंडे, खजिनदारपदी अॅड. दत्ता सुदाम शेंडगे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून अॅड. स्वाती श्रीकांत पितळे, अॅड. शारदा सखाराम गालफाडे, अॅड. हर्षदा उत्कर्ष दोडके, अॅड. नेहा बळीराम सोनवणे, अॅड. नागनाथ गोपाळ सूर्यवंशी व अॅड. तानाजी राजाराम मोरे यांचा समावेश आहे.
यावेळी अॅड. नितीन कांबळे, अॅड. जयश्री कुटे, अॅड. पवन गायकवाड, अॅड. भवले, अॅड. सविता तोडकर, अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. सागर आढागळे, अॅड. प्रशांत बचुटे, अॅड. आरती कुलकर्णी, अॅड. पूजा हिरवटे / शिनगारे, अॅड. चांगुणा काकडे, अॅड. तुषार खरात, अॅड. पल्लवी कुऱ्हाडे, अॅड. सुनील गायकवाड, अॅड. तेजस चौरे, अॅड. नितीन तिडके यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संदीप तापकीर यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. संगीता कुसाळकर यांनी केले.















