न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 30 जानेवारी 2025) :- चिखली कुदळवाडी, मोशी परिसरातील अनधिकृत गोदामे, दुकाने, पत्राशेड्सवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने गुरुवारी सकाळी सुरूवात केली होती.
यावेळी स्थानिक, दुकानदार, व्यापारी यांनी महापालिका प्रशासनास कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा उद्रेक पहावयास मिळाला. त्यामुळे त्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरणा निर्माण झाले होते.
कुदळवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदामे, हॉटेल्स, वर्कशॉप्स, बेकरी अशी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडमधील तब्बल ५ हजार आस्थापनांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोटीस बजावल्या होत्या.
संबंधितांनी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेडस् तातडीने काढून न टाकल्यामुळे महापालिकेने कारवाई सुरु केली. त्यामुळे लघुउद्योजकांमध्ये घबराट पसरली आणि कारवाईच्या विरोधात व्यवसायिक रस्त्यावर उतरले.














