न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गुंडा स्काॅड पथक तयार केले आहे. गुंडा स्काॅड पथकामध्ये स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे पथक दररोज सायंकाळी सात ते रात्री बारा या कालावधीत शहरात विशेष गस्त करणार आहे. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. ९) ते बुधवार (दि. १५) या आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ३ हजार ७३ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
आठवडाभराच्या कालावधीत पोलिसांनी एकूण सहा हजार ७८२ वाहनांची तपासणी केली. त्यातील २५३१ वाहनांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर १४५ हॉटेलवर वेळेची मर्यादा व इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.











