न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- मावळ लोकसभेचा निकाल जाहीर झालेला नसतानाही विधानसभेसाठीची पुढील समीकरणे आताच बांधून इच्छुक मंडळी कामाला लागल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. मात्र, ही समीकरणे लोकसभेच्या निकालाने धूसर होऊ शकतात. जो-तो इच्छुक उमेदवार विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आप-आपले कार्यक्षेत्र सुरक्षित ठेवण्यासठी आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांनी वेगवेगळी टॅगलाईन वापरून मतदारसंघात धुमाकूळ घातला आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातिसाठी राखीव असल्याने भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी समाजासाठी रस्त्यावर उतरणाऱ्याच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असा सोशल मिडीयावर मेसेज फिरत आहे.
काय आहे व्हायरल मेसेजमध्ये . .
पिंपरी विधानसभा. मित्र पक्षानो आमचे तर तुमच्या दोघाच्या पहिलेच ठरले आहे . . .
”पिंपरी विधानसभा मतदार संघ हा रिपाई (A) चा बालेकिल्ला आहे व त्या मतदार संघावर आमचाच हक्क आहे. पिपरी मतदार संघात मा.चंद्रकांताताई सोनकांबळे याच रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (A) व मित्रपक्षाच्या उमेदवार असतील. मित्रांनो १ / १ / २०१८ रोजी भिमा कोरेगावात आपल्या महिला, लहान मुले व वयस्कर लोकांवर जातीयवादी गुंडानी हल्ला केला. त्यानंतर पिंपरीत २ / १ / २०१८ रोजी पिंपरीमध्ये भिडे एकबोटेवर पहिला गुन्हा दाखल झाला. त्या २ व ३ जानेवारी २०१८ यावेळी पिंपरी चौकात आंदोलन झाले. त्या आंदोलनात जे नेते सामिल होते, अश्या नेत्यांनीच पिपरी मतदार संघासाठी दावेदारी करावी.
विद्यमान आमदार, माजी आमदार, विद्यमान खासदार (राज्यसभा) व जे आता उमेदवारीसाठी ‘आमचं ठरलयं’ असे पोस्ट वायरल करतात ते त्या भिमा कोरेगाव हल्ल्याच्या वेळेस महापालिकेची तिजोरी संभाळण्यात व्यस्त असणा-या सिमाताई सावळे यांना पिंपरी विधानसभेत (मागासवर्ग) थांबण्याचा कसलाही अधिकार नाही. जे आता गुडघ्याला बाशींग बांधुन चिंचवड विधानसभेत राहणा-या व कधीही बहुजनांच्या आंदोलनात सहभागी नसणाऱ्या युवक नेत्यांनी तर पिपरी विधानसभेत फिरकूही नये.
वरील अश्या सर्व नेत्यांना, ज्यांनी भिमा कोरेगाव हल्ल्याविरुध्द आवाज उचलला नाही, अश्या नेत्यांनी पिपरी विधानसभेतील बहुजन वस्त्यामध्ये फिरू नये. अन्यथा बहुजन जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल.
– सुरेश निकाळजे, पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (A)











