न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे १७ संशयित रूग्ण आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची माेहिम हाती घेतली आहे.
या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेली संशयित रूग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पुरविल्या जाणा-या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत.
त्यानुसार शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आराेग्य प्रयाेगशाळेत पाठविले हाेते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, माेशी, भूमकर वस्ती, संत तुकारामनगर परिसरातील पाणी पिण्यास अयाेग्य असल्याचा अहवाल आला आहे.
ज्या भागातील पाणी दूषित आढळले आहे. त्या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. ‘ओटी साेल्यूशन’ टाकून पाणी तपासण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागाने पाण्याचे नमुने घेताना पाणी पुरवठ्याच्या अधिका-यांना साेबत घ्यावे.
– प्रमोद ओंभासे, पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता १…















