न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील फक्त निवास झोनमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी संधी देऊनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
पीएमआरडीए हद्दीतील सुमारे ७०० गावांमध्ये सुमारे दहा हजारांच्या घरात अनधिकृत बांधकामे असताना, बांधकामे अधिकृत करण्यासाठी फक्त मोजकेच अर्ज आले आहेत. यापार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत असलेली मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत करण्यास प्राधिकरणाच्या समितीने मान्यता दिली आहे.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनयमात अलिकडेच सुधारणा केल्या आहेत. पीएमआरडीएने त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील गुंठेवारीत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली. त्यानुसार दि. ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार आहेत.
समाविष्ट २३ गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडे आहेत. या २३ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तसेच शहरालगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आहेत. तरीसुध्दा बांधकामे अधिकृत करण्यासाठी अपेक्षित अर्ज प्राधिकरणाकडे आलेले नाहीत. त्यामुळे प्राधिकरणाने बांधकामे अधिकृत करण्यासाठी असलेली मुदत वाढविविली आहे.



















1 Comments
📨 Ticket- TRANSFER 0.75565573 BTC. Continue =>> https://telegra.ph/Binance-Support-02-18?hs=da4ed3485920c87212cf4b66e18b5bca& 📨
lcycuh