- शहरातील एकूण ३० हजार ८०० विद्यार्थी; पाच भरारी पथकांच्या नेमणुका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२५) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे. शहरात एकूण ३० हजार ८०० विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यासाठी ४८ परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.
दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी तीन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तर शुक्रवारी सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी पाच भरारी पथके नेमली आहेत. या पथकांच्या वतीने परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देण्यात येत आहे. यावेळी कॉपी करणारे तसेच गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
सर्व परीक्षा केंद्रांवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यावर विशेष भर आहे. तसेच कॉपी रोखण्यासाठी ‘शाळा भेट उपक्रम’ राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर उपाययोजना केल्या आहेत. पथकांची कारवाई सुरू आहे. बारावी परीक्षेत अद्याप अनुचित प्रकार आढळलेला नाही. – विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका…
दहावीच्या परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. शहरामध्ये खासगी व महापालिका शाळांमध्ये ४८ केंद्र आहेत. दहा महापालिका शाळांचा समावेश आहे. पाच भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. खासगी शाळांतील २८ हजार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी माध्यमाचे २३०० विद्यार्थी, तर मनपा उर्दू माध्यमाच्या ५०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंडळातर्फे यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.
– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी…












2 Comments
Charlesetta Fumagalli
I’ve been exploring for a little bit for any high-quality articles or weblog posts in this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this site. Reading this info So i am happy to show that I’ve an incredibly just right uncanny feeling I found out exactly what I needed. I such a lot indisputably will make sure to do not omit this site and give it a glance regularly.
Free Boxing Streams
There are actually a whole lot of details like that to take into consideration. That may be a nice point to bring up. I provide the ideas above as normal inspiration but clearly there are questions like the one you bring up the place the most important thing will be working in sincere good faith. I don?t know if finest practices have emerged around issues like that, however I am certain that your job is clearly identified as a fair game. Both girls and boys feel the impact of just a second’s pleasure, for the rest of their lives.