न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथील जुन्या एल्प्रो कंपनीजवळ नव्याने उभारलेल्या २० लाख लिटरच्या पाण्याचे टाकीचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी, माजी नगरसदस्य नामदेव ढाके, कार्यकारी अभियंता विजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचवड परिसरातील अनेक भागांतील पाणी पुरवठा सुरळित होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या २० लाख लिटर पाण्याची टाकीची मदत होणार आहे. चिंचवड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमुळे या भागातील सुदर्शननगर, तानाजी नगर, केशवनगर, श्रीधरनगर यासह चिंचवड गावातील पाणी पुरवठा सुरळित होण्यास अधिक मदत होणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले














