न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२५) :- शिवसेनाउद्धव ठाकरे गटात अस्वस्थता असून गळती लागली आहे. शिरूर लोकसभेच्या जिल्हा संघटिका, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी अखेर शिवबंधन तोडले. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाळे गटाने प्रवेश केला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराजांना एकत्र करून शिंदेसेनेत आणण्याची खेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून खेळली जात आहे.
त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. उबाळे यांच्या पक्षांतराची चर्चा तीन महिन्यांपासून होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह चिंचवड शहर संघटक संतोष सौंदणकर आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.











