- शाळेच्या आवारात छ. शिवाजी महाराज पुतळा उभारणी..
- पर्यावरण विभागासाठी कार्यकारी अभियंता पद मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांना स्थायी समिती व महापालिका सभेमध्ये प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य देणे योजना राबविणे तसेच मौजे किवळे सर्वे नं. ८८ येथील अ. क्र. ४/१४५ येथे भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणे, प्रभाग क्र. २० कासारवाडी येथील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे व अनुषंगिक कामे करणे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता या अभिनामाच्या मंजूर पदांच्या संख्येत १ ने वाढ करणे, चिखली परिसरातील मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती भागातील अरूंद रस्त्यांचे खडीकरण करून डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १ शेलारवस्ती, मोरेवस्ती, चिंचेचा मळा भागातील रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणे आदींसाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.















