न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२५) :- निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत आधार कार्डाला मतदार कार्डाशी लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीआयबीने दिलेल्या वृत्तानुसार, संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार, मतदानाचा अधिकार केवळ भारताच्या नागरिकालाच प्रदान करण्यात आला आहे आणि आधार कार्ड त्या व्यक्तीची ओळख आहे.
संविधानाच्या अनुच्छेद ३२६ आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) च्या तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केले आहे.
दिल्ली येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची केंद्रीय गृह सचिव, विधान विभागाचे सचिव, मैती विभागाचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आधार कार्ड आणि मतदार कार्डाला लिंक करण्याचा निर्णय घेतला गेला.