न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२५) :- तरुणीला रस्त्यात अडवून तिला मारहाण केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १८) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडली.
याप्रकरणी मारहाण झालेल्या तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव नारायण देडे (वय २०, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी भाजीपाला घेण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपीने तरुणीला त्याच्यासोबत येण्याबाबत विचारले. तरुणीने नकार दिला असता आरोपीने गाडीच्या डिकीतून टोकदार हत्यार काढून तरुणीला डोक्यात मारून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.











