- नाहक कामगारांनी गमावला जीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२५) :- दिवाळीचा पगार न दिल्याने चालकाने ट्रॅव्हल्स पेटवली, असा खुलासा पोलीस चौकशीत झाला आहे. बसचालक जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. यात चार कामगारांचा नाहक मृत्यू झाला आहे. यामुळे हिंजवडीतील घटनेला वेगळे वळण मिळाले असून हा कोल्ड मर्डर ठरला आहे.
कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणार्या टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची समोर आले. चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे


















