न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- निसर्ग वादळ व कोरानामुळे अडचणीत आलेल्या पुणे जिल्ह्यातील कलकराई गावाला प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशनच्या सभासदांच्या वतीने मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला.
येथील गावकऱ्यांना रविवारी (दि. १४) रोजी सर्व घरांसाठी ताडपत्री संच, दोन महीने पुरेल एवढे धान्य व इतर गृहउपयोगी खाद्य तसेच प्राथमिक आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. हे साहित्य डोंगरावर वसलेल्या कलकराई गावात घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला.
प्रयत्न तर्फे अजित काळभोर, सुधाकर मोरे, अमोल कुदळे, स्वप्नील डाळिंबकर, प्रतिक भोसले, विशाल कुदळे, प्रमोद यादव, आनंद घाटविलकर, बालाजी पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.