न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. शहरातील काही भागांमध्ये हा प्रसार स्टेज न राहता सामुदायिक प्रसार (Community Transfer Stage) सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वेगाने होणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहरातील काही भागातील नागरिकांच्या हालचालीवर, बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आधीच्याच असणाऱ्या कंटेनमेन्ट झोनमध्ये शहरातील काही भागांचा नव्याने समावेश केला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कंटेनमेन्ट झोनची संख्या १०७ वर पोहोचली आहेत. यात शहरातील पुढील भागांचा समावेश आहे.
- पिंपरीतील वल्लभनगर, आकाशनगर सोसायटी, शास्त्रीनगर, वैभवनगर रोड दोन, खराळवाडीतील साईसिद्धी अपार्टमेंट, भीमनगर, बौद्धनगर, गुरुदत्तनगर.
- नाणेकर चाळ, भाटनगर, सोनकर कॉम्पलेक्स, सोनकर चेंबर्स.
- नेहरूनगरमधील नवजीवन सीएचएस, मोरवाडीतील सुखवानी इमपेरियल, लालटोपीनगर.
- आकुर्डीतील दत्तनगर, रामनगर, आदर्श गृहनिर्माण सोसायटी, काळभोरनगर.
- प्राधिकरणातील आनंद पार्क, सेक्टर २७.
- दापोडीतील गुलाबनगर, न्यू गुलाबनगर, एसएमएस कॉलनी, शेवाळे अपार्टमेंट, माने चाळ.
- कासारवाडीतील केशवनगर.
- चिंचवडमधील बहिरवाडे कॉप्लॅक्स, शाहूनगर, सोनिगरा औपेल, आपुलकी सीएचएस, रेणुका अपार्टमेंट दळवीनगर, बिजलीनगरमधील श्रीराम कॉलनी. केशवनगर, साईबाबानगर. इंदिरानगर, आनंदनगर.
- किवळेतील एमबी कॅम्प, सिद्धीविनायक कॉलनी, रावेतमधील हॉलमार्क अव्हेन्यू.
- वाल्हेकरवाडीतील गुरुदत्त कॉलनी.
- पिंपळेसौदागर येथील रोझ आयकॉन, कवडेनगर, गणेशम दोन, रॉयल एम्पेरिओ, दिव्या हाईट्स.
- पिंपळे गुरवमधील नेताजीनगर, रामकृष्ण चौक.
- सांगवीतील शिवांजली रोड, मधुबल लेन दोन, समतानगर, ममतानगर लेन दोन.
- जुनी सांगवीतील शिंदेनगर, संगमानगर, साई सेहा पार्क, येस रेसिडन्सी संगमानगर, ढोरेनगर, उषकाल सीएचएस.
- पिंपळे निलखमधील शिक्षक सोसायटी.
- वाकडमधील सद्गुरु कॉलनी, मजिनी चौक कलाटेनगर, कमलाकर चौक, मानकर एम्पायर, बेला वेस्टा, ज्ञानप्रभा स्कूल.
- काळेवाडीतील विजयनगर, नढेनगर, सखीहरी बँक, ज्योतीबा नगर, रहाटणीतील शिवतिर्थनगर, थेरगावातील बेलटिकानगर.
- भोसरीतील राधाकृष्णनगर, साई अपार्टमेंट गुरुविहार, खंडोबा माळ दोन, बालाजीनगर, गीता सोसायटी, गवळीनगर, संत तुकारामनगर.
- चिखलीतील यशवंतनगर, पाटीलनगर, मोरवस्ती, रेजेंट पार्क, गोकूळ सीएचएस, ओम साई सीएचएस. ईगनझेका पार्क, क्रिस्टल सिटी.
- निगडीतील महात्माफुले सोसायटी, साईकृपा सीएचएस, साईनाथनगर, रुपीनगरमधील कौतय सीएचएस, पंचदूर्गा सीएचएस.
- त्रिवेणीनगर, अजंठानगरमधील सिद्धार्थ बिल्डींग, यशोदा सीएचएस, थरमॅक्स चौक.
- च-होलीतील तनिष्क ऑर्केड, काटेनगर, फुलेनगर.
- वडमुखवाडी दिघीतील बीयू भंडारी.
- बोपखेलमधील छत्रपती चौक.