न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२०) :- येरवडा परिसरात फिजिकल डिस्टंन्सिग राखण्याच्या दृष्टीने एका संस्थेच्या इमारतीमध्ये तात्पुरते कैद्यांसाठी कारागृह तयार करण्यात आले होते. येथून दोन कैदी बाथरूमच्या खिडकीतून बाहेर उडी टाकत पळून गेले होते.
त्यातील एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शनिवारी (दि. १३) रोजी पुन्हा बेड्या ठोकल्या. अरशद हनिफ सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव होते.
त्यातील दुसऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी आज मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास बेड्या ठोकल्या. आकाश बाबुलाल पवार (वय २१, रा. आयप्पा मंदीराशेजारी, नढेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.