न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22. जून. 2020) :- पेट्रोल पंपावर काम करणा-या ऑपरेटरला कोयत्याचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी पाच हजारांची रोकड पळवली .
ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी घडली. गणेश अण्णा मोहिते ( वय 42 , रा . नढेनगर , काळेवाडी ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अतुल काळूराम शिंदे , रोहन माणिक जाधव ( दोघे रा . गांधीनगर झोपडपट्टी , पिंपरी ) , किरण ( पूर्ण नाव पत्ता माहिती नाही ) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तीन आरोपी दुचाकीवरून फिर्यादी मोहिते काम करत असलेल्या पेट्रोल पंपावर आले . चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरले . पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणा – या ऑपरेटर सद्दाम चाऊस याला चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवला आणि त्याच्या हातातील पाच हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले . पिंपरी पोलीस तपास करीत आहेत .