न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22. जून. 2020) :- स्वः राजीव गांधी प्रतिष्ठानचे वतीने नुकत्याच एम. पी. एस. सी. 2019 च्या झालेल्या परिक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेली कुमारी. विशाखा अविनाश बलकवडे हिचा सन्मान प्रतिष्ठानचे अध्यक्ष काॅग्रेसचे संदेश दत्तात्रय नवले व किसान काँग्रेस सेल महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्षाषसरिता जामनीक मॅडम, काँग्रेसचे आबासाहेब खराडे, रवी जामनीक मंत्रालय, मुलीचे आई,वडिल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
विशाखाला पुढिल वाटचालीस शुभेच्छा देताना आणखी पुढे जाऊन कलेक्टर च्या परिक्षा देण्यास प्रोत्साहन दिले.
ही मुलगी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन शिकुन पुढे आली. वडिल पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे गटार कुली म्हणून सेवेत आहे. मुलीने आपल्या आई वडिलांचे स्वप्न नायब तहसीलदार पदी निवड करून पुर्ण केले. अशा मुलांना प्रतिष्ठानचे वतीने नेहमीच गौरवण्यात येते. पिंपरी गावच्या मुकूटात यामुळे शिरपेचात तुरा लावलेला आहे असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले म्हणाले.