न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- शहरात तपास पथकातील पोलीस गस्त घालत असताना रिव्हर व्ह्यू हॉटेलजवळ तीन मुले एकाच दुचाकीवरून येत असल्याचे पोलिसांना दिसले. तिन्ही मुलांचा संशय आल्याने पोलिसांनी तिघांना थांबवून त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी ती दुचाकी त्यांनी चिंचवड येथील रांका ज्वेलर्स या दुकानाच्या समोरून चोरी केल्याचे सांगितले.
मौजमजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी खडकी, चतुश्रुंगी, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी आणि चिंचवड येथून दुचाकी आणि रिक्षा चोरी केल्याच्या पोलिसांनी उलगडा केला.
या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, चिंचवड, हिंजवडी, एमआयडीसी भोसरी, खडकी आणि चतुश्रुंगी या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. तीन अल्पवयीन मुलांकडून तीन ऑटो रिक्षा आणि सहा दुचाकी असा एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.