- अखेर विरोधी पक्षनेतेपदासाठी राजू मिसाळांच्या नावावर शिक्कमोर्तब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बाबतचा प्रस्ताव आज (दि. ७) नगरसचिवांकडे दिला आहे. ३४ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असल्याने मिसाळ नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अधिकृत नोंदणी झाल्यानंतर महापौर उषा ढोरे या मिसाळ यांच्या नियुक्तीची घोषणा करतील.
राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला. दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा पक्षाचा निर्णय आहे.
राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी उपमहापौर राजू मिसाळ यांच्यासह माजी महापौर वैशाली घोडेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, विधी समितीचे माजी सभापती संतोष कोकणे इच्छुक होते.
यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज सादर केले होते. दरम्यान अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी उपमहापौर राजू मिसाळ यांना झुकते माप दिले आहे.