न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२०) :- देहूरोडमधील शितळानगर, मामुर्डी येथे कत्तलीसाठी जनावरे आणल्याची माहिती बजरंग दल गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिल्यावर तीन जिवंत बैल सुमारे ४० हजारांचे २२० किलो मांसासह एक टेम्पो देहूरोड पोलिसांनी रविवारी (दि. ६) जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण व सुधारणा कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
राजू नूर मोहम्मद कुरेशी (वय ४५, रा.गांधीनगर, देहुरोड), सोहेल शेरअली पिरजादे (२१, रा. आबेडकरनगर, देहूरोड) आणि बबलू (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध पशुकल्याण सभासद शिवशंकर स्वामी (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी देहूरो पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.