न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक रामदास गेनभाऊ बोकड (वय ६०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल (शुक्रवारी) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
रामदास बोकड यांना शुक्रवारी त्रास होत होता. त्यांना पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. रात्री अकराच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्यांचे निधन झाले आहे. महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत पिंपळे गुरवमधून रामदास बोकड बिनविरोध निवडून आले होते. त्यांनी क्रीडा समितीचे सभापतीपद देखील भूषविले होते.