- व्होटर डेस्कसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघात दोघांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत नाव सापडत नसल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदार यादीतील नाव शोधणे सहज शक्य होईल याकरिता डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत Voters Help Desk तयार करुन ERO Net प्रणालीवर कामकाज करणा-या ०२ कर्मचा-यांची नेमणूक करावी, अशा सूचना केल्या आहेत.
त्यानुसार ३३ मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघाकडील Voters Help Desk च्या कामकाजासाठी अनिल कुदळे, मुख्य लिपिक (मो.क्र.९९२२५३५२३४) व अमर कांबळे कॉम्प्युटर ऑपरेटर (मो.क्र.९५२७५१४८०५) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी या सुविधेचा वापर करुन आपले मतदान केंद्र माहिती करुन मतदानाच्या दिवशी मतदान करुन लोकशाहीच्या उत्सव पर्वामध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन सहा.निवडणूक निर्णय अधिकारी २०५ – चिंचवड विधानसभा मतदार संघ यांनी केलं आहे.