- पिंपळे सौदागरमधील पालकांच्या शिष्टमंडळाने घेतली खासदारांची भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींच्या हाताला काम मिळेना, यातच शाळेची फी भरणे देखील कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील पालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेवून शिक्षण संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची फी कमी करण्याची मागणी केली.
शहरात अनेक शिक्षण संस्था आहेत. यातील अनेक संस्थांची वार्षिक फी लाखाच्यावर आहे. सर्वसामान्य नागरिकांना फी भरणे कठीण झाले आहे. ज्या मुलांनी फी भरली नाही, त्या मुलांकडे लक्ष दिले जात नाही. त्यांना शाळेतून काढण्याची धमकी दिली जात आहे. फीमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी पालकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.