न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशा २१४ नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी खटले दाखल केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, फिजिकल डिस्टन्सिगचे पालन करावे, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, सेनिटायझर आदींचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार अशा नागरिकांवर खटले दाखल करण्यात येत आहेत. पिंपरी – चिंचवड पोलिसांनी शनिवारी एमआयडीसी भोसरी (१), भोसरी ( ३ ), पिंपरी ( १९ ), चिंचवड ( ११ ), निगडी (४), आळंदी (२१), दिघी (२३), म्हाळुगे चौकी (१), सांगवी (९), वाकड (७७), हिंजवडी (१०), तळेगाव दाभाडे (३), तळेगाव एमआयडीसी (४), चिखली (११), रावेत चौकी (१७) या पोलीस ठाण्यांतर्गत २१४ नागरिकांवर खटले दाखल केले.